केडगाव : शिवसेनेने बेरजेचे राजकारण कधी केले नाही. शिवसेनेचा मुख्य उद्देश विकास करून शहराचे रूपडे पालटण्याचा आहे. शिवसेनेने इतर पक्षाप्रमाणे कधीही श्रेय लाटण्याचे काम केले नाही. उपनगराची व्याप्ती झपाट्याने वाढत असताना नियोजनबद्ध विकास होणे आवश्यक आहे. उपनगरांचा विकास फक्त शिवसेनेच्या माध्यमातून होऊ शकतो, असे प्रतिपादन नगरसेवक अनिल शिंदे यांनी केले.
लिंक रोड, केडगाव येथील जे. एल. पी. सोसायटीमधील कल्पतरू कॉलनी येथे स्वीकृत नगरसेवक संग्राम शेळके यांच्या निधीतून वाॅर्ड क्रमांक १५ येथे अंतर्गत ड्रेनेजलाईन कामाच्या उद्घाटनप्रसंगी शिंदे बोलत होते.
यावेळी नगरसेवक संग्राम शेळके, नगरसेवक विजय पठारे, प्रवक्ते रमेश परतानी, कृष्णा साळवे, संग्राम केदार, पिराजी कोतकर, दिलीप दहिफळे, अप्पासाहेब गागरे, जालिंदर पालवे, सागर गायकवाड, आनंद विधाते, तेजस कपिले, नीलेश लहाने, आदित्य पालवे, चेतन जाधव, डॉ. सोमनाथ पवार व सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.