शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

नेवासा तालुक्यातील देवगडचे मंदिर भाविकांसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:57 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र देवगडचे दत्त मंदिर, संस्थानचे भक्तनिवास, प्रसादालय, उपहारगृहे, इतर दूकाने पुढील प्रशासकीय आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती मंगळवारी संस्थानच्या वतीने देण्यात आली.

नेवासा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र देवगडचे दत्त मंदिर,संस्थानचे भक्तनिवास, प्रसादालय, उपहारगृहे, इतर दूकाने पुढील प्रशासकीय आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती मंगळवारी संस्थानच्या वतीने देण्यात आली.किसनगिरीबाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने १६ मार्च ते २१ मार्च या कालावधीमध्ये सप्ताहाचे अत्यंत अत्यल्प प्रमाणात नियोजन केलेले होते. तथापि सध्यस्थितीमध्ये कोरोना विषाणूंच्या संसर्गाचे वाढते प्रमाण, तसेच महाराष्ट्रातील विषाणूबाधितांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीची ठिकाणे नियंत्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व प्रकारच्या धार्मिक स्थळांना दर्शन बंद करण्याचे तसेच गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून मंदिर करण्याचा निर्णय घेतला आहे. एक सामाजिक जबाबदारी म्हणून संस्थान प्रशासनाने नियोजित पुण्यतिथी कार्यक्रम पूर्णत: रद्द केलेला आहे.  संस्थानचे भक्तनिवास, प्रसादालय, उपहारगृहे, इतर दुकाने तथा मंदिर प्रवेश पुढील प्रशासकीय आदेशापर्यंत बंद ठेवलेली आहेत. श्री क्षेत्र देवगड येथे दर्शनार्थ येणा-या सर्व भाविकांनी कृपया याची नोंद घेऊन श्री क्षेत्र देवगड येथील गर्दी नियंत्रणासाठी संस्थान व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.