- सुनील साळुंखेशिरपूर - कालभैरवाचे दर्शन घेऊन कोपरगावकडे परतणाऱ्या कारला कंटेनरने जोरदार धडक दिली. यात कार दुभाजकावर जाऊन धडकली. हा अपगात गुरूवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील बिजासन घाटातील चिडीमोड गतिरोधकाजवळ घडली. गाडीतील सहाजण सुदैवाने बचावले आहेत.
कोपरगाव येथील सहाजण जण कारने (क्र. एमएच ४६-एक्स २५५०) उज्जैन येथे कालभैरवाच्या दर्शनाला गेले होते. तेथून परतत असताना बिजासन घाट उतरत असताना त्यांच्या कारला मागून येणारा कंटेनरने ( क्रमांक एचआर-५५-एसी-९७६६) जोरदार धडक दिली़ धडक एवढी जोरदार होती की कार सुमारे ३० फुट घसरत जावून दुभाजकावर जाऊन आदळली़ कारचा एक भाग पूर्णपणे चक्काचूर झाला़ त्यात गाडीचे मोठे नुकसान झाले, सुदैर्वाने गाडीतील मित्रांना किरकोळ मार लागला़
घटनेची माहिती काही अंतरावर असलेल्या बिजासन पोलिस चौकीचे प्रमुख अनिल दासोंधी यांना मिळाली़ त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेवून कारमधील जखमींना बाहेर काढले़ तोपर्यंत कंटेनरचा चालक अंधाराचा फायदा घेत पसार झाला. तर सहचालकाला सेंधवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़