लोकमत न्यूज नेटवर्कशिर्डी : रूग्णसेवेच्या माध्यमातून आपला जीव धोक्यात घालून समाजाची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय सेवेतील देवदुतांच्या मदतीसाठी समाज पुढे येत आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमिवर साईबाबा रूग्णालयातील डॉक्टर्स व नर्सिंग सेवेतील व्यक्तींच्या संरक्षणासाठी शिर्डीतीस नागरिकांनी एक लाखाहुन अधिक रकमेचे शंभर पीपीई (पर्सनल प्रोटेक्शन इक्युपमेंट) कीट उपलब्ध करून दिले आहेत़कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात येणाºया डॉक्टर्स, नर्सेस, वार्डबॉय, सुरक्षा रक्षक आदींना या संक्रमणाचा त्रास होऊ नये,म्हणून ग्रामस्थांकडून ही काळजी घेण्यात येत आहे़ यासाठी सुरेश लोकचंदानी, महेश लोकचंदानी, बबलू लोकचंदानी, प्रकाश लोकचंदानी, जय लोकचंदानी, माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर यांनी पन्नास हजार रुपये तर राष्ट्रवादीच्यावतीने सुधाकर शिंदे, रमेश गोंदकर, निलेश कोते, संदीप सोनवणे, अमित शेळके, महेंद्र शेळके यांनी तीस हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहेत.यातील उर्वरीत रकमेबरोबरच आणखी सुरक्षा साहित्य आणण्यासाठी अनेकजणांनी तयारी दर्शवली आहे़ संस्थान व आरोग्य यंत्रणांकडे पुरेसे मास्क, सॅनिटायझर, उपलब्ध असले तरी पीपीई किटची आवश्यकता आहे़ साईनाथ रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ़ मैथिली पितांबरे व रूग्णालयाचे आभाळे यांनी संस्थानचे सीईओ अरूण डोंगरे, डेप्युटी सीईओ रविंद्र ठाकरे, वैद्यकीय संचालक डॉ़ विजय नरोडे, प्रशासकीय अधिकारी डॉ़ प्रीतम वडगावे यांच्या मदतीने हे कीट उपलब्ध केले आहेत़ गेल्या आठवड्यात येथील राजेंद्र कोते व तुषार शेळके यांनीही शिलधी प्रतिष्ठाणच्या माध्यमातून शंभर कीट संस्थान रूग्णालयाला दिले आहेत़ या प्रमाणेच कीट व सुरक्षा साहित्यासाठी शिर्डीकरांनी पुढे यावे,असे आवाहन माजी नगराध्यक्ष कैलास कोते, कमलाकर कोते, सुजीत गोंदकर आदींनी केले आहे़
साईनगरीतील देवदुतांना ग्रामस्थांकडून सुरक्षा साहित्य,शंभर पीपीई कीट रुग्णालयास प्रदान : सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 11:50 AM