अहमदनगर : ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून - ‘गणपती बाप्पांचा जयघोष’, ढोल, ताशांचा गजर, गुलालाची मुक्त उधळण, अशा मंगलमय वातावरणात जिल्ह्यात शुक्रवारी ठिकठिकाणी विघ्नहर्ता श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सार्वजनिक मंडळांनी रात्री उशिरापर्यंत ‘श्री’ची प्रतिष्ठापना केली.पारनेर : ७० गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’पारनेर : तालुक्यात सुमारे ७० गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबवून ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाच्या आगमनप्रसंगी काही भागात पावसाने तुरळक हजेरी लावली तरी दुष्काळाचे सावट गणेशोत्सवावर असल्याचे दिसून आले.पारनेरसह निघोज, टाकळीढोकेश्वर, सुपा, जवळे, वाडेगव्हाण, वडझिरे, अळकुटी, गोरेगाव, राळेगणसिध्दी येथे उत्साहात गणेशाची स्थापना करण्यात आली. पारनेर शहरात जय भवानी मित्र मंडळ, संभाजीनगर मित्र मंडळ, जाणता राजा मित्र मंडळ, जीप-चालक मित्र मंडळ, गणपती गल्ली मित्र मंडळ, नवरत्न मित्र मंडळ, सागरदास मित्र मंडळ, संत गोरोबा कुंभार मित्र मंडळ, पिंपळेश्वर मित्र मंडळ, पराशर मित्र मंडळ,विघ्नहर्ता मित्र मंडळ, भैरवनाथ मित्र मंडळ, क्रांती चौक मित्र मंडळ, पद्मावती मित्र मंडळ, काशी विश्वेश्वर मित्र मंडळ, नो चँलेज मित्र मंडळ, विघ्नहर्ता मित्र मंडळ, पाटाडी मळा, नवयुग मित्र मंडळ व नागेश्वर मित्र मंडळांनी ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना केली. दरवर्षी पारनेरच्या मुख्यपेठेतून मिरवणूक काढून अनेक गणेश मंडळे प्रतिष्ठापना करीत होते. मात्र यावर्षी एक ते दोन मंडळे वगळता इतरांनी मिरवणूक न काढणेच पसंत केले.श्रीगोंद्यात मूर्ती खरेदीसाठी गर्दीश्रीगोंदा : श्रीगोंदा शहरासह तालुक्यात उत्साहपूर्ण वातावरणात गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. वरुणराजाने जलवर्षाव केल्याने गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. श्रीगोंदा येथील कुंभारवाड्यात गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांची झुंबड उडाली होती. पन्नास रुपयापासून ते २१ हजारापर्यंत गणेश मूर्र्तींच्या किंमती होत्या. जयमल्हारच्या वेषातील गणरायाच्या मूर्र्तींना मागणी होती. यंदा गणेशमूर्र्तींच्या किंमतीत पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली होती. तसेच सजावट साहित्यही महागले होते.पाथर्डीत पावसामुळे उत्साहपाथर्डी : पाथर्डी शहरासह तालुक्यात ‘श्रीं’ ची उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. ढोल, ताशांच्या निनादात तसेच गुलालाची उधळण करीत सार्वजनिक गणेश मंडळांनी सायंकाळी ‘श्री’ ची प्रतिष्ठापना केली. घरगुती मूर्ती खरेदीसाठी सकाळपासून गर्दी झाली होती. दुपारपर्यत घरगुती गणेशाची स्थापना करण्यात आली. दुुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांनी सवाद्य ‘श्री’ ची प्रतिष्ठापना केली. मानाचे समजले जाणारे नवोदय तरूण मंडळ, कसबा तरूण मंडळ, विश्वकर्मा तरूण मंडळ, जयभवानी तरूण मंडळ, गणेश पेठ तरूण मंडळ, सुवर्णयुग परिवार ट्रस्ट, व्यापारी मित्र मंडळ, गोल्डन ग्रूप, नाथनगर, साईनाथनगर,वामनभाऊ नगर, फुले नगर आदी भागातील मंडळांनी सायंकाळ नंतर ‘श्री’ ची प्रतिष्ठापना केली. दुपारी पावसाच्या हलक्या सरी पडल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला. पाथर्डी शहरासह तिसगांव, माणिकदौंडी, करंजी, खरवंडी आदी भागात ‘श्री’ ची उत्साहात प्रतिष्ठापना झाली. शेवगाव : मूर्ती ४० टक्के महागल्याशेवगाव : शेवगावसह तालुक्यात पारंपारिक पध्दतीने श्री गजाननाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. विविध सार्वजनिक मंडळांच्या ‘श्रीं’ची सायंकाळी उशिरापर्यंत प्रतिष्ठापना सुरु होती. शेवगाव येथे चाळीस तर तालुक्यात १५० पर्यंत सार्वजनिक मंडळांनी गणरायाची स्थापना केली. तालुक्यातील अमरापूर येथे यंदा प्रथमच ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविण्यात आल्याचे पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले. यंदा गणेश मूर्र्तींच्या किंमतीत गेल्यावर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यापर्यंत वाढ झालेली असतानाही मंडळाचा मोठ्या मूर्ती खरेदीकडे कल होता. दहा रुपयापासून ते अकरा हजारापर्यंत मूर्र्तींच्या किंमती होत्या, असे स्थानिक कारागीर नितीन भोकरे यांनी सांगितले. शेवगाव येथील गजराज ग्रामविकास प्रतिष्ठान सार्वजनिक मंडळाच्या गणपतीची मंडळाचे अध्यक्ष अरविंद पटेल, सदाशिव बाबर यांच्या हस्ते, स्वराज्य ग्रामविकास प्रतिष्ठान मंडळाच्या उत्सवाचा प्रारंभ जि. प. सदस्य अशोक आहुजा यांच्या हस्ते आरती करुन झाला. भोईराज, वडार समाज, चालक, मालक संघटना, राजयोध्दा, श्री स्वामी समर्थ, शिवशक्ती, सावता युवा ग्रूप, नेता सुभाष, ओम साई, राजमुद्रा, टिळक, भगतसिंह आदी सार्वजनिक मंडळांच्या उत्सवाचा प्रारंभ मिरवणुकीने जल्लोषात झाला. शेवगाव व तालुक्यातील विविध मंडळाच्यावतीने यंदाही विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले.
विघ्नहर्त्याची भक्तिभावाने प्रतिष्ठापना
By admin | Published: August 29, 2014 11:33 PM