अहमदनगर : सुधारीत नागरिकत्त्व कायद्याविरोधात आज सायंकाळी नगरमध्ये सभा होत आहे. या सभेत जाऊन कायद्याला विरोध करणाºयांचा आपण विरोध करू, अशी ठाम भूमिका हिंदु राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी माध्यमांशी बोलताना नगर येथे सांगितले.नगर येथील ईदगाह मैदानावर आज सायंकाळी एनआरसीला विरोध करण्यासाठी महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर देसाई आज नगरमध्ये आले असून ते सभेच्या ठिकाणी जाणार असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. आज दुपारी देसाई हे शासकीय विश्रामगृहावर आले होते. त्यांनी त्यांची भूमिका माध्यमांकडे मांडली. ते म्हणाले, एनआरसीला विरोध करणार आहे. सभेच्या ठिकाणी जाऊन विरोध करणार आहे. पोलिसांनी मला समज द्यायला आले होते. मात्र भिवंडीमध्ये जेंव्हा पोलिस मारले जातात. बंगाल, उत्तर प्रदेशात पोलिसांवर हल्ले होतात. पोलिसांवर हल्ले करणारे हे काही देशाचे नागरिक असू शकत नाहीत. तो दहशतवादी पिलावळीची अवलाद आहे. त्यांना शोधून ठेचणे काढणे गरजेचे आहे. लवकरात लवकर जागे व्हा. संख्या मोठी आहे. सभेची संख्या मोठी असली तरी राष्ट्रद्रोहींचे ते झालेले एकत्रीकरण आहे. त्यांना राष्ट्र विकायचे आहे. शंभर कोटींच्या हिंदुंचा हा देश आहे. त्याला नासू आणि बाटू दिले जाणार नाही.ते जिल्हाधिकारी यांनाही निवेदन देणार आहेत. दरम्यान सभेच्या पार्श्वभूमीवर त्यांना कधीही अटक होऊ शकते.
एनआरसीविरोधातील सभेत जाऊन विरोध करणार- धनंजय देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 1:18 PM