देवदैठण : शिरूर येथील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक धरमचंद भवरीलाल फुलफगर यांची न्हावरा येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी निवड करण्यात आली आहे.
घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार ॲड. अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या सभेत फुलफगर यांची तज्ज्ञ संचालक म्हणून निवड करण्यात आली. कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांच्या सहीचे नियुक्ती पत्र कारखान्याचे उपाध्यक्ष ॲड. रंगनाथ थोरात यांच्या हस्ते फुलफगर यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी गोडीजी पार्श्वनाथ जैन टेम्पल ट्रस्टचे अध्यक्ष सतीश धाडिवाल, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम, संचालक शिरीष बरमेचा, प्रकाश बोरा, प्रकाश बाफणा, राष्ट्रवादी कॉंग्रेस लिगल सेलचे प्रदेश सरचिटणीस ॲड. शिरीष लोळगे, तालुकाध्यक्ष ॲड. प्रदीप बारवकर, शहराध्यक्ष डॉ. रवींद्र खांडरे, ॲड. संजय ढमढेरे, देवल शहा, सुनील बोरा, सुनील धाडिवाल, देवेंद्र फुलफगर आदी उपस्थित होते.
290521\img-20210528-wa0047.jpg
धरमचंद फुलफगर यांची संचालकपदी निवड झाल्यामुळे सन्मान करताना मान्यवर . इतर फोटो साऊथ वर