बोधेगाव : तालुक्याच्या पूर्वभागातील लाडजळगाव येथील ढाकणे वस्ती व कोकटवाडी येथे जिल्हा परिषद सदस्या अंजली काकडे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या निधीतून सुमारे तीस लाख रुपये खर्चाच्या साठवण बंधाऱ्यांचे खोलीकरण करण्यात आले.राणेगाव येथे वीस लाख रुपये खर्चून बांधलेल्या सिमेंट बंधारे परतीच्या पावसाने हे बंधारे तुडुंब भरून जोरदारपणे वाहू लागले आहेत. या बंधाऱ्यांचे जलपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले, बंधाऱ्यांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविल्याने त्याचा पाणीसाठ्यात वाढ होऊन शेतीला फायदा होऊन टंचाईवर मात होण्यास मदत होणार आहे.बोधेगाव जि.प. गटात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्ते, वीज आदी प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात आले आहेत. भविष्यकाळात विविध कामे सुरू होतील. विकासात्मक कामे प्राधान्याने मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. यावेळी पांडुरंग तहकिक, काकासाहेब तहकिक, बप्पासाहेब तहकिक, आबासाहेब सांगळे, माणिक ढाकणे, अंबादास ढाकणे, कालिदास ढाकणे, गहिनीनाथ ढाकणे, शिवाजी पादर, अजिनाथ वडते, दिगंबर चव्हाण, बंडू जंजाळ, रमेश सांगळे, भगवान पाटील, अशोक भिसे, कचरू उदे, कचरू सिरसाट, त्रिंबक ढाकणे, कोंडिबा तहकिक, राजेंद्र जंजाळ, कल्याण घुमरे, काकासाहेब घुमरे, सुरेश घुमरे, प्रकाश मारकंडे, गणेश तहकिक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. (वार्ताहर)
३० लाख खर्चाच्या बंधाऱ्यांचे खोलीकरण
By admin | Published: October 29, 2016 12:10 AM