शेतकरी परिसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संदीप कापसे होते. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक ढगे यांनी समर्पक उत्तरे दिली. अशोक ढगे यांनी माती तपासणीचा अहवाल कसा वाचावा. शेतावर पाण्याचे नियोजन कसे करावे. सेंद्रिय पदार्थाचा वापर करून जमिनीची सुपीकता वाढवावी. रोगांच्या बंदोबस्तासाठी जैविक पद्धतीचा अवलंब कसा करावा यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात ॲड. विश्वास काळे, गोरक्षनाथ कापसे, बाबूराव काळे, ॲड. संजय लवांडे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी कृषी मंडल अधिकारी वैशाली पाटील, कृषी अधिकारी लक्ष्मण सुडके, आत्माचे कृषी सहाय्यक संजय जाधव, कुमार गर्जे तसेच शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक संजय कदम यांनी केले.
....
कोबी पिकाची पाहणी
शेतकरी किशोर नवथर यांच्या उसातील आंतरपीक कोबीची पाहणी केली. ढगे यांनी जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी समतोल खतांचा वापर, रासायनिक खतांचा तंतोतंत उपयोग, हिरवळीची खते यांचा वापर करावा असा सल्ला दिला.
...
फोटो-१२ भेंडा कोबी
...
ओळी-नेवासा तालुक्यातील नागापूर परिसरातील शेतकरी किशोर नवथर यांच्या उसातील आंतरपीक कोबीची पाहणी करताना कृषी शास्त्रज्ञ, अधिकारी, शेतकरी.