लोकमत न्यूज नेटवर्क
राहुरी : डिझेलच्या किमती वाढल्याने शेतीसाठी ट्रॅक्टर मशागतीचे दरही वाढले आहेत. राहुरी तालुक्यात नगर जिल्ह्यात ट्रॅक्टर मशागतीचे दर वाढल्याने शेतकरीवर्गही अडचणीत आला आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे.
राहुरी येथील जोगेश्वरी आखाडा ट्रॅक्टर चालक-मालक संघटनेने २० जानेवारीपासून ट्रॅक्टर मशागतीचे दर वाढविले आहेत.
डिझेलचे दर गगनाला भिडल्याने मशागतीचे दरही वाढावे लागले आहे. याशिवाय, ट्रॅक्टरला लागणाऱ्या स्पेअरपार्टचे दर वाढले आहेत. त्यामुळे नाइलाजाने जोगेश्वरी आखाडा येथील ट्रॅक्टर चालक-मालक संघटनेने ट्रॅक्टर मशागतीचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
....
मशागतीचे दर असे-(रुपयांंत)
नांगरणी प्रतिएकर -२५००
रोटा मारणे प्रतिएकर-२५००
खुरटणी प्रतिएकर-१५००
दहा गुंठ्यांच्या आतील नांगरणे, रोटर मारणे-१०००
सरी पाडणे प्रतिएकर-१५००
पेरणी प्रतिएकर-२०००
पालाकुट्टी करणे प्रतिएकर-२०००
रोटर मारून रस्ता तयार करणे-७०००
तीन किलोमीटर डम्पिंग भाडे-५००
शेत लेव्हलिंग करणे प्रतितास-७००
...
डिझेल, स्पेअरपार्ट व मजुरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे नाइलाजाने मशागतीचे दरही वाढवावे लागले आहे.
- सौरभ भोंगळ, ट्रॅक्टरमालक,
जोगेश्वरी आखाडा, राहुरी
....
भाडोत्री ट्रॅक्टर लावून उत्पन्नाचा निम्मा वाटा ट्रॅक्टर मशागतीसाठी जातो. शेतकऱ्यांसाठी डिझेलचे भाव कमी करावे, ही दखल केंद्र व राज्य सरकारने दोघांनीही घ्यावी. तरच, अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती करण्यास परवडेल. अन्यथा, अल्पभूधारक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.
-विलास वराळे,
अध्यक्ष, मुळा थडी शेतकरी बचत गट, राहुरी
.....
२३ राहुरी टॅक्टर.
..
ओळी-राहुरी तालुक्यात ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत केली जाते. डिझेलचे दर वाढल्याने मशागतीचेही भाव वाढले आहेत.