खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्ड्यासह पंचक्रोशीतील हभप, संत सद्गुरु सीताराम महाराज उंडेगावकर (वय ८८) यांचे पुणे येथे खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. बाबांचा समाधी सोहळा ३१ आॅगस्ट रोजी दुपारी एक वाजता होणार आहे. येथील व्यावसायिकांनी शनिवारी व्यवहार बंद ठेऊन बाबांना श्रध्दांजली वाहिली. बाबांचे खर्ड्याबरोबर परजिल्ह्यातही भक्तगण आहेत.बाबांचा जन्म परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील सावरगाव येथे झाला. त्यांचे खरे नाव सीताराम साधू शिंदे आहे. त्यांनी आपले आयुष्य परमार्थात घालविले. आतापर्यंत त्यांनी सुमारे ८५ मंदिरांची उभारणी करुन भक्तांच्या देणगीतून अन्नदान केले. खर्डा गावातील दानशुरांनी आतापर्यंत सीताराम गडासाठी पाच ते सहा एकर जागा दान दिली. तसेच पंढरपूर येथील विठ्ठल-रुख्मिणी मूर्तीसाठी २८ तोळे सोन्याचे जानवे अर्पण केले. बाबांच्या निधनाचे वृत्त समजताच भाविकांची खर्ड्याकडे रिघ लागली होती. (वार्ताहर)
सीताराम उंडेगावकर यांचे देहावसान
By admin | Published: August 30, 2014 11:13 PM