अहमदनगर : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. परंतु आता तोच रुग्ण पूर्णपणे बरा होऊन आपल्या घरी परतला आहे. अहमदनगर शहरातील बूथ हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षातून रविवारी (दि.२९ मार्च) सकाळी दहा वाजता या रुग्णाचा डिस्चार्ज झाला. यावेळी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी, या रुग्णावर उपचार करणारे बूथ हॉस्पिटलचे डॉक्टर, नर्स या सर्वांनी या रुग्णाला टाळ्यांच्या गजरात निरोप दिला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात राहून प्रशासनाला सहकार्य केले. तर अहमदनगरमधील कोरोनाला प्रतिबंध नक्कीच बसू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दरम्यान या रुग्णाला घरीच १४ दिवस आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. रुग्णाची तब्येत ठणठणीत आहे. आता नगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या तीन वरून दोनवर आली आहे.
नगरमधील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाला अखेर डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 12:42 PM