ग्रामपंचायत कार्यालयात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची पहिलीच सभा (दि. १६) खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून काळे बोलत होते.
ग्रामसभेच्या प्रारंभी ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जोशी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. त्यानंतर गावातील दलित वस्तीला शुद्ध पाणी मिळावे यासाठी स्वतंत्र आरओ प्लँट, हायमास्ट बसविणे, पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामांना प्राधान्य देण्याचे ठरले. वाड्या-वस्त्यांवरील रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी योग्य ती कार्यवाही तत्काळ सुरू करण्याचा ठराव झाला.
यावेळी उपसरपंच संतोष चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जरे, प्रवीण मरकड, बंडू तोरमड, निलेश कुंभकर्ण, मिनीनाथ थोरात, सुधाकर शिरसाठ, विष्णू जाधव, शंकर शेळके, बाबासाहेब खडके, पत्रकार नानासाहेब चेडे आदी उपस्थित होते. प्रवीण मरकड यांनी आभार मानले.
...
सार्वजनिक कामात गावाचा एकोपा नेहमीच दिसून येतो. यापुढेही सार्वजनिक कार्यात सर्व घटकांना विश्वासात घेऊन कामकाज होईल, असा आमच्या सर्वांचा प्रयत्न असणार आहे.
-राजेंद्र जरे, ग्रामपंचायत सदस्य, भावीनिमगाव.