प्रारंभी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सोनाली वामन, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील सकट, ओम दहीवाळकर, सोहेल शेख, ओम मिसाळ, दिव्या अल्हाट, आरती सकट, आदित्य मोहिते, निखिल जाधव, सुशीलाबाई सकट, आयुष कासार, प्रसाद सकट, सायली आडेप, अनन्या चोथे, आदिती मोरे, रुद्र भुरला, पूजा सकट, भरत दाते, सुधीर सकट, ज्येष्ठ नागरिक भीमराव सकट, सुशीला सकट, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना वामन म्हणाल्या, युवाशक्ती हीच देशाची खरी संपत्ती आहे. समाजात बदल घडविण्यासाठी राजमाता जिजाऊंचा आदर्श घेऊन संस्कार घडविण्याची गरज आहे. स्वामी विवेकानंद यांचे विचार युवकांनी आत्मसात केल्यास जीवनाला योग्य दिशा मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
फोटो १२ जयंती
ओळी- स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त लहुजी शक्ती सेनेच्या वतीने नालेगाव येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मास्कचे वाटप करण्यात आले.