पळवे : जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांच्या वतीने वाडेगव्हाण (ता. पारनेर) येथील नाभिक बांधवांना कोरोना काळात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, राजेंद्र शेळके, आबा घनवट, संतोष यादव, रवींद्र पाडळकर, तुषार पवार, मावळेवाडी सरपंच उदय कुरकुटे, ज्ञानदेव वाघमारे, वसंत वाघमारे, दिलीप वाघमारे, लहू शेळके, ग्रामस्थ उपस्थितीत होते.
एक वर्षापासून देशभरात कोरोना महामारीचे मोठे संकट उभे राहिले आहे. या दरम्यान उद्योग व्यवसाय बंद होते. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. यावर्षीदेखील १४ एप्रिल रोजी राज्य शासनाने लाॅकडाऊन जाहीर केला. त्यात सलूनची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला. त्यामुळे नाभिक समाजातील बांधवांना सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे आपले कुटुंब कसे चालवावे, असा प्रश्न नाभिक बांधवांना पडला होता. अशातच सुजीत झावरे यांनी केलेली मदत नाभिक समाजासाठी लाख मोलाची ठरत आहे. त्यांनी केलेल्या मदतीने नाभिक बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
-----
२० वाडेगव्हाण
वाडेगव्हाण येथील नाभिक बांधवांना सुजीत झावरे यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.