पाथर्डी : शहरामध्ये लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना अक्षय्य तृतीयेचा सण साजरा करता यावा या सामाजिक जाणीवेतून नगरसेवक रामनाथ बंग मित्रमंडळाच्या वतीने ६४ कुटुंबांना शंकर महाराज मठाचे प्रमुख माधव बाबा यांच्या हस्ते किराणा मालाचे वाटप करण्यात आले.
यावेळी अय्युब सय्यद, व्यापारी राजू डागा, पत्रकार अविनाश मंत्री, अनिल खाटेर, सोमनाथ लाहोटी, जगदीश लोहिया, गोविंद लाहोटी, गोरक्ष चन्ने, नगरसेविका दीपाली बंग आदी उपस्थित होते. घरोघर किराणामालाचे वाटप करण्यासाठी मंडळाचे सदस्य बबन दहिफळे, हिमांशू राऊत, गोरक्ष रोडी, जगदीश टाक, सागर बागडे, सचिन रत्नपारखी, सुरेश कुलथे, गजानन नाकील, संजय कुलकर्णी, सलीम शेख, प्रफुल्ल चिंतामणी, गुंड्या रोडी, विजय राठोड, आलोक बंग, मधुरा बंग, योगेश कलंत्री आदी परिश्रम घेत आहेत.
---
१३ रामनाथ बंग
पाथर्डी शहरामध्ये नगरसेवक रामनाथ बंग मित्रमंडळाच्या वतीने ६४ गरजू कुटुंबांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले.