कान्हूर पठार : पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील गरजूंना आनंदसिंधू वृद्धाश्रमाच्यावतीने किराणा वाटप करण्यात आले.
सध्याच्या परिस्थितीत कोरोनामुळे अनेकांवर कठीण वेळ आली आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत. हातावर हात ठेवून पोट भरणार कसं. अशा परिवारांचा सर्व्हे करून त्यांना किराणा वाटप करण्यात आले. यासाठी राजे शिवाजी पतसंस्थेचे शाखाधिकारी किसन सोनावळे यांनी मोलाचे योगदान दिले आहे. ॲड. कृष्णा झावरे यांनी किराणा उपलब्ध करून दिला. कोरोना परिस्थिती निवळेपर्यंत हे किराणा वाटप सुरू रहाणार आहे. याशिवाय टाकळी ढोकेश्वर, गांजीभोयरे, पारनेर येथील गरजूंनाही किराणा वाटप करण्यात आले.
यावेळी कृष्णा झावरे, कान्हुर पठार पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सखाराम ठुबे, राजे शिवाजी पतसंस्थेचे शाखाधिकारी किसन सोनावळे, फिनिक्सचे प्रसाद खिलारी, वैभव लोंढे, फिनिक्सचे अध्यक्ष विलास महाराज लोंढे सहभागी झाले होते.
----
२७ कान्हूर पठार
कान्हूर पठार येथे ॲड. कृष्णा झावरे आणि मित्र परिवाराने गरजूंना किराणा दिला.