सामाजिक कार्यकर्त्यांनी किराणा किटसाठी स्वेच्छेने आर्थिक सहकार्य केले. त्यामुळे कामगारांची चूल पेटती राहिली, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दाटून आला होता. कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. गोरगरीब आणि रोजंदारीवरील मजुरांचे हाल होत आहेत. कामगार कारागीर विधवा व निराधार गरजू अशा १०५ कुटुंबांना किराणा सामान मदत घर पोहच झाली.
महाराष्ट्र विश्वकर्मा सेनेचे संस्थापक अध्यक्ष कैलास मोरे यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच अनेक जिल्ह्यात हा उपक्रम राबविला गेला. याबद्दल मोरे यांनी नगरचे जिल्हाध्यक्ष मनोज जाधव, युवा सेना प्रदेश संघटक भूषण सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष आदिश मोरे व शहराध्यक्ष निलेश सोनवणे यांचे कौतुक केले.
यावेळी तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब मोरे, शहर उपाध्यक्ष रवींद्र देवरे, निलेश जाधव, जिल्हा सचिव राजेंद्र सूर्यवंशी, संपर्क प्रमुख राजेंद्र शिरसाठ, संदीप वाघ, आबा जाधव, सोमनाथ शिरसाठ, राजेंद्र भालेराव, अनिल सूर्यवंशी, बाबासाहेब गवळी, प्रशांत वाघ, सुनील सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
-----------------------