निंबळक : जिल्हा बँकेच्यावतीने खोसपुरी (ता. नगर) परिसरातील १ हजार २०० शेतकऱ्यांना भाजपचे जिल्हा सरचिटणीस अक्षय कर्डिले यांच्या हस्ते सोसायटी पीक कर्जापोटी तीन टक्के व्याजाच्या रकमेचे वाटप करण्यात आले.
खोसपुरी (ता. नगर) येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. या बँकेच्या अंतर्गत पांगरमल, मजले चिचोंली, खोसपुरी, उदरमल या गावांचा समावेश आहे. शासनाच्या सहा टक्के व्याज वाटपापैकी तीन टक्के वाटप करण्यात आले. उर्वरित तीन टक्के वाटपही लवकरच करणार असल्याचे कर्डिले यांनी सांगितले.
यावेळी भाजप सहकार आघाडीचे जिल्हा प्रमुख बबनराव आव्हाड, नारायण आव्हाड, भीमराज आव्हाड, किसन आव्हाड, रामकिसन आव्हाड, धर्मानाथ आव्हाड, अमित आव्हाड, भाऊसाहेब आंधळे, इंद्रजीत आव्हाड, कारभारी आव्हाड, महादेव आव्हाड, भाऊसाहेब धनवळे, अली शेख, भाऊसाहेब मोढवे आदी उपस्थित होते.