या कार्यक्रमाप्रसंगी वारी परिसरातील अनेक दिव्यांग बंधू, भगिनी तसेच त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. प्रारंभी ग्रामविकास अधिकारी प्रशांत बरबडे यांनी ग्रामपंचायतीमार्फत दिव्यांगांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच सर्व दिव्यांग बंधूंचा व भगिनींचा ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने सत्कार करून जॉबकार्डचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नातून ५ टक्के निधी उपलब्ध करून सर्व दिव्यांग बंधूंना जवळपास १ लाख २० हजार रुपयांची आर्थिक रक्कम येणाऱ्या काही दिवसांत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपसरपंच मनीषा गोर्डे, सदस्य संजय जाधव, विजय गायकवाड, राहुल टेके, विवेक टेके, सुवर्णा गाजभिव, नंदा निळे, रोहिणी निळे, गोकुळ कानडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे स्वागत ग्रामविकास अधिकारी प्रशांत बरबडे यांनी केले, तर ग्रामपंचायत सदस्य राहुल टेके यांनी आभार मानले.
....................
फोटोओळी०३- वारी