देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील मेंगलवाडी येथे राज्य शासन कृषी विभाग यांच्या वतीने कीडरोग सर्वेक्षण प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांसाठी शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कृषीधन शेतकरी गटाने यासाठी पुढाकार घेतला. अध्यक्षस्थानी राजापूरच्या सरपंच प्रतीक्षा धनंजय मेंगवडे होत्या.
गावातील प्रमुख पिके कापूस, तूर, ऊस, बाजरी यांच्या अवस्था व त्यावर येणारे शेंद्री बोंडअळी, लष्करी अळी, चक्री भुंगा, उंट अळी आदी अति नुकसानकारक किडींचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कृषी विभागामार्फत कामगंध सापळे एकरी पाच या प्रमाणात २०० सापळ्यांचे वाटप प्रगतिशील शेतकरी धनंजय मेंगवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
कृषी सहायक प्रतीक कांबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रकांत मेंगवडे, बाळासाहेब वीर, सुशीला करंजुले, विद्या वीर, गोरख करंजुले, दादाभाऊ धावडे, नारायण कौठाळे, रामदास ढवळे, ज्ञानदेव मांडगे, ओंकार मेंगवडे, प्रवीण मेंगवडे, अशोक कोरडे, अभिमन्यू गाडेकर, नारायण वीर, नंदकुमार शेळके, भास्कर धावडे, सुरेंद्र मेंगवडे, जगन्नाथ धावडे, बाळासाहेब धावडे, संदीप धावडे, एकनाथ सरडे, पांडुरंग मेंगवडे उपस्थित होते.