अळकुटी : जिल्हा बँकेच्या माध्यमातून शिरापूर (ता. पारनेर) सेवा सोसायटीने १ कोटी २२ लाख रुपयांचे खावटी कर्ज वाटप केल्याची माहिती दुग्ध व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती मधुकर उचाळे यांनी दिली.
उचाळे म्हणाले, बागायती क्षेत्र असल्याने पशुपालन व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु, यंदाचा अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा तयार करता आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना चारा खरेदी करण्यासाठी खावटी कर्जाचे वाटप केले आहे. खावटी कर्जाच्या धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी सेवा संस्था अध्यक्ष दिनेश लोणकर, उपाध्यक्ष मल्हारी शिनारे, संचालक कैलास कांदळकर, अंकुश वडणे, मच्छिंद्र उचाळे, धोंडीभाऊ आढाव, अर्जुन चाटे, सबाजी शेळके, भरत आग्रे, सुमन खाडे, इंदूबाई शिनारे, शाखाधिकारी कचरे, संस्थेचे सचिव ए. एस. जाधव, सहसचिव जी. बी. साबळे, सभासद उपस्थित होते.
फोटो : २८ मधुकर उचाळे