अहमदनगर : नवनागापूर व एमआयडीसीमधील गोरगरीब नागरिकांना स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने किराणा किटचे वाटप करण्यात आले. परिसरातील गरजू कुटुंबीयांना एक हजार किटचे वाटप करण्यात आले. यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश गलांडे यांनी पुढाकार घेतला.
यावेळी नवनागापूरचे सरपंच डॉ.बबन डोंगरे, उपसरपंच दत्ता पाटील सप्रे, ग्रामपंचायत सदस्य दीपक गीते, शंकर शेळके, नरेश शेळके, सुनील शेवाळे, आकाश दंडवते, उद्योजक अमोल घोलप, अमित बारावकर, संतोष कांबळे, संजय चव्हाण, सुभाष दांगट, अरबाज खान, अमोल घुटे, स्वप्निल खराडे, संतोष शेवाळे, सागर गलांडे, संतोष दळवी, अक्षय बहिर, विशाल गीते, हुसेन सय्यद, बाबा दांगट, हर्षल बिरंगळ आदी उपस्थित होते.
यावेळी योगेश गलांडे म्हणाले, मनुष्य जीवनावर कोरोना महामारीचे भयंकर संकट आले आहे. नागरिक भयभीत झाले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांचा रोजगार गेला आहे. अनेक कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संघटनांमध्ये प्रत्येकाने मदतीचा हात पुढे केला पाहिजे. समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानने एक महिनाभर पुरेल, एवढा किराणा साहित्य देण्यात आले. एमआयडीसीमध्ये गेल्या आठ वर्षांपासून स्वराज्य कामगार संघटनेने प्रामाणिकपणे काम करून कामगारांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून दिला आहे.
दीपक गीते म्हणाले, संकट काळामध्ये युवकांनी एकत्रित येऊन सामाजिक जबाबदारी सांभाळली पाहिजे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून एम.आय.डी.सी व गजानन कॉलनी परिसरातील गरजू कुटुंबीयांना एक हजार किराणा वस्तूंचे किट मोफत देण्यात आले. शंकर शेळके म्हणाले, स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब कुटुंबीयांना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी एक महिन्याच्या किराणा मालाचे किट देण्यात येत आहे. यामध्ये साखर, शेंगदाणे, बेसन पीठ, तेल, चहा पावडर, मिरची पावडर, तांदूळ, हळद, मीठ, गव्हाचा आटा, तूरडाळ, पोहे, सोयाबीन आदी वस्तू या किराणा किटमध्ये आहेत.
--
फोटो- २९ स्वराज प्रतिष्ठान
स्वराज प्रतिष्ठानने गजानन कॉलनी, एमआयडीसी परिसरातील नागरिकांना किराणा साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी किट देताना योगेश गलांडे, सरपंच बबन डोंगरे, दत्ता पाटील सप्रे आदी.