या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा दुर्गा तांबे, नगरविकास विभाग मंत्रालय मुंबईचे उपसचिव विजय चौधरी, नंदूरबार येथील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव, रोटरीचे प्रकल्प प्रमुख नरेंद्र चांडक, सुनील घुले, सहायक प्रांतपाल दिलीप मालपाणी उपस्थित होते.
यावेळी सुधीर तांबे म्हणाले, कौशल्ये निर्माण करणारे शिक्षण देण्याबरोबरच राष्ट्राच्या प्रति बांधीलकी जपणारे नागरिक निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे.
रोटरी राष्ट्र बांधणीचे शिल्पकार पुरस्काराने पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कैलास पवार, मुख्याध्यापक शैलजा फटांगरे, शिक्षक पांडुरंग गोसावी, दत्तू आव्हाड, शायदा शेख, उमेश काळे, स्वाती भोर, संदीप पोखरकर, प्रीती खालकर, बाळासाहेब भागवत, योगिता वडनेरे यांना सन्मानित करण्यात आले.
डॉ. प्रमोद राजुस्कर, महेश वाकचौरे, सुनील कडलग, रवींद्र पवार, ओंकार सोमाणी, पवनकुमार वर्मा, संजय कर्पे, ओंकार गंधे, रवींद्र ढेरंगे, ऋषिकेश मालानी, आनंद हासे, मधुसूदन करवा, आदी उपस्थित होते. अध्यक्ष गाडे यांनी प्रास्तविक केले. डॉ. विनायक नागरे व डॉ. विकास करंजेकर यांनी सूत्रसंचालन केले. सचिव ऋषीकेश मोंढे यांनी आभार मानले.