शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
2
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
4
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
5
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
6
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
7
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
8
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
9
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
10
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
11
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
12
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
13
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
14
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
15
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
16
BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद
17
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 
18
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
19
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
20
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे

जिल्हा बँकची शाखा, सेवा संस्थेतही ग्राहकांची झुंबड,पोलिस प्रशासन हतबल,पेट्रोल पंपावरही रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 1:44 PM

लोकमत न्यूज नेटवर्क टाकळी ढोकेश्वर : कोरोना लॉकडाऊनचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. पेट्रोल, बँका, विविध कार्यकारी सेवा संस्था यांच्या कार्यालयांच्या वेळेच बंधन असल्यामुळे ग्रामिण भागातील पेट्रोल पंपासह बँका व सेवा संस्थांसोमरही ग्राहकांची झुंबड उडाली आहे. नागरिकांना घरी बसा हे सांगत पोलिस प्रशासनही चांगलेच हतबल झाले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कटाकळी ढोकेश्वर : कोरोना लॉकडाऊनचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. पेट्रोल, बँका, विविध कार्यकारी सेवा संस्था यांच्या कार्यालयांच्या वेळेच बंधन असल्यामुळे ग्रामिण भागातील पेट्रोल पंपासह बँका व सेवा संस्थांसोमरही ग्राहकांची झुंबड उडाली आहे. नागरिकांना घरी बसा हे सांगत पोलिस प्रशासनही चांगलेच हतबल झाले आहे. टाकळी ढोकेश्वर(ता.पारनेर)येथील पेट्रोल पंपाची चालू राहण्याची वेळ सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत आहे. टाकळी ढोकेश्वर हे ३५ ते ४० गावांची बाजारपेठ असल्याने पेट्रोल भरण्यासाठी ग्राहकांना तीस ते ४० किलोमीटर वरून यावे लागते आहे. या पेट्रोल पंपावर सकाळी ७ ते ७:३० वाजण्याच्या दरम्यान अर्धा ते एक किलोमीटर रांगा लागत आहे. दुसरीकडे शासनाने सुरू केलेल्या संजय गांधी व श्रावणबाळ या योजनांच्या माध्यमातून एक हजार रुपये मानधन काढण्यासाठी ग्रामिण भागातील वृध,अपंग,विधवा सह विविध लाभधारक जिल्हा बँकेच्या शाखांपुढे गर्दी करत आहेत. तिसरीकडे शासनाने लॉकडाऊनमुळे गोरगरिबांसाठी स्वस्त धान्य दुकानांमार्फत माणसी ५ किलो धान्य वाटप सुरू केले आहे. यासाठीही लांबच लांब रांगा लागत आहेत. पोलिसांना याचा अतिरीक्त ताण वाढला आहे. नियोजनाअभावी ग्राहकांची झुंबड उडाली आहे.--- लॉकडाऊनमध्ये प्रशासनाची दमछाक...!पारनेर तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असल्याने पारनेर तालुक्याचा विचार करता व गुन्हयांचे प्रमाण पाहता पोलिसांवर मोठा ताण पडत आहे. पारनेर तालुक्यातील जनतेने गरज नसताना बाहेर न पडता घरात राहून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पारनेरचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी केले आहे.

फोटो- १८ टाकळी ढोकेश्वर १, १८टाकळी ढोकेश्वर २टाकळी ढोकेश्वर(ता.पारनेर)येथील जिल्हा बँकेच्या शाखेत पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या रंग लागल्या असून गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसते आहे. दुसºया छायाचित्रात पेट्रोल पंपावरही लांबच लांब रांगा लागल्या आहेत.