समितीत निखिलकुमार ओसवाल, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर ठाकरे, विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे, युवराज ढेरे पाटील, ग्रामविकास अधिकारी, अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक संघटना आदींचा समावेश होता. समितीने आठवडच्या ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, स्मशानभूमी, ग्रामपंचायत मालकीच्या शेत जमिनीतील वृक्ष लागवड, वनाेद्यान, घरकूल, वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शोषखड्डे, मेहकरी नदी खोलीकरण, बंधारे आदी पाहाणी करून ग्रामपंचायत दप्तर तपासणी केली. गावातील सर्व कामे पाहून समाधान व्यक्त केले.
यावेळी सरपंच राजेंद्र मोरे, उपसरपंच बाबासाहेब मोरे, सुनील लगड, भाऊसाहेब लगड, शरद मोरे, पप्पू मोरे, भगवान शिंदे, सागर रसाळ, बबन मोरे, नानासाहेब गाडे, ग्रामसेवक लोखंडे, मोरे, एकशिंगे, शिक्षक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
..फोटो-१२आठवड स्मार्ट ग्राम
...
ओळी-नगर तालुक्यातील आठवड विकास कामांची पाहणी करताना जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम तपासणी समिती.