शहरातील लालटाकी रस्त्यावरील हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळावर त्यांच्या १३७ व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी खानदेशे बोलत होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, विश्वस्त मुकेश मुळे, जयंत वाघ, सदस्य दीपक दरे, वसंत कापरे, अरुणा काळे, राहुल झावरे यांच्यासह प्राचार्य डॉ. भास्कर झावरे, प्राचार्य अशोक दोडके आदी उपस्थित होते.
खानदेशे म्हणाले, इंग्रजांनी छत्रपती चौथे शिवाजी महाराजांना कोल्हापूरहून नगरच्या भुईकोट किल्ल्यात हलविले. किल्ल्यातील एका इमारतीत त्यांना एकांतात ठेवून इंग्रज अधिकाऱ्यांनी महाराजांचा मानसिक व शारीरिक छळ केला. यातच २५ डिसेंबर १८८३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधी लालटाकी रोडवरील जिल्हा मराठा बोर्डिंगसमोरच्या प्रांगणात करण्यात आला. या घटनेला आज १३७ वर्षे लोटली आहेत. दरवर्षी संस्थेच्या वतीने २५ डिसेंबर रोजी त्यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात येतो.
फोटो २५ अभिवादन
ओळी- छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना जी. डी. खानदेशे. समवेत संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, रामचंद्र दरे, मुकेश मुळे, दीपक दरे, अरुणा काळे, जयंत वाघ, प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे आदी.