अहमदनगर : दरवर्षी देण्यात येणाऱ्या तालुकानिहाय १४ शिक्षक व २ केंद्रप्रमुख अशा एकूण १६जणांना जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. विभागीय आयुक्तांच्या मान्यतेनंतर ही नावे जाहीर झाली असून, येत्या महिनाअखेर जाहीर कार्यक्रम घेऊन या शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे.दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवशी उत्कृष्ट काम करणाऱ्या जि. प. शिक्षक व केंद्रप्रमुख यांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते.
या प्रक्रियेसाठी शिक्षक व केंद्रप्रमुख यांची १०० गुणांची प्रश्नावली अद्ययावत करून जिल्हा परिषद, अहमदनगरच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिक्षक व केंद्रप्रमुखांनी पंचायत समिती कार्यालयामध्ये स्वयंमूल्यमापन करून प्रश्नावली जमा केली. प्रत्येक तालुक्यातून आलेल्या प्रस्तावांची गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी (शिक्षण) यांच्यामार्फत पडताळणी होऊन ३ शिक्षक (त्यामध्ये एक शिक्षिका) व १ केंद्रप्रमुख यांचे प्रस्ताव जिल्हा कार्यालयास पाठविण्यात आले.
प्रस्ताव प्राप्त शिक्षक व केंद्रप्रमुख यांची २५ गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समितीची बैठक होऊन पथकाकडून प्राप्त १०० गुणांची प्रश्नावली व लेखी परीक्षेचे २५ गुण अशा एकूण १२५ गुणांपैकी ज्यांना सर्वांत जास्त गुण मिळाले, अशा प्रत्येक तालुक्यातून १ शिक्षक यांचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे मान्यतेस पाठवण्यात आला.त्याला मान्यता मिळून आयुक्तांनीच ही १६ नावांची यादी जाहीर केली आहे....असे आहेत शिक्षक पुरस्कार्थीशिक्षक शाळानरेंद्र राठोड, जि. प. शाळा, तिर्थाचीवाडी, ता. अकोलेसोमनाथ घुले, जि. प. शाळा, पिंपळगाव माथा, ता. संगमनेरसचिन अढांगळे, जि. प. शाळा, बहादरपूर, ता. कोपरगावभारती देशमुख, जि. प. शाळा, खर्डे पाटोळे, ता. राहातासविता साळुंके, जि. प. शाळा, गोंडेगाव, ता. श्रीरामपूरअनिल कोल्हापुरे, जि.प. शाळा, पिंपरी अवघड, ता. राहुरीसुनीता निकम, जि. प. शाळा, भालगाव, ता. नेवासाअंजली चव्हाण, जि. प. शाळा, बोधेगाव, ता शेवगावभागिनाथ बडे, जि. प. शाळा, सोमठाणे नलवडे, ता. पाथर्डीएकनाथ चव्हाण, जि. प. शाळा, बसरवाडी, ता. जामखेडकिरण मुळे, जि. प. शाळा, बर्गेवाडी, ता. कर्जतजाविद सय्यद, जि. प. शाळा, मढेवडगाव, ता. श्रीगोंदाविजय गुंजाळ, जि. प. शाळा, सांगवी सूर्या, ता. पारनेरसाधना क्षीरसागर, जि. प. शाळा, कौडगाव, ता. नगर
केंद्रप्रमुखरावजी केसकर (पारनेर, मुले, दक्षिण)अशोक विटनोर (उक्कलगाव, ता. श्रीरामपूर, उत्तर)