शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

जिल्हा परिषदेच्या बदल्यांमध्ये गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 12:56 PM

जिल्हा परिषदेतील बदल्यांची प्रक्रिया सोमवारी सुरु झाली. मात्र, बदल्यांच्या वेळापत्रकातत व निकषांमध्येही मोठ्या प्रमाणावर गोंधळ असल्याचे दिसून येत आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेतील बदल्यांची प्रक्रिया सोमवारी सुरु झाली. मात्र, बदल्यांच्या वेळापत्रकातत व निकषांमध्येही मोठ्या प्रमाणावर गोंधळ असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी सकाळी ९ वाजता आलेल्या महिला व बालकल्याण विभागातील महिला कर्मचाऱ्यांना प्रशासनाने रात्री ९ वाजेपर्यंत ताटकळत ठेवले. याबाबत या महिलांसह कर्मचारी संघटनेनेही नाराजी नोंदवली. मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकाऱ्यांत बदल्यांवरुन विसंवाद दिसून आला.बदली प्रक्रियेसाठी अर्थ विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, महिला बालकल्याण विभाग अशा चार विभागातील कर्मचाºयांना सोमवारी बोलाविण्यात आले होते़ सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदेतील सभागृहात बदली प्रक्रियेला प्रारंभ झाला़ प्रारंभी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या मागण्यांवर चर्चा सुरु झाली़ ही चर्चा साडेबारा वाजेपर्यंत चालली़ त्यानंतर बदलीची प्रक्रिया हाती घेण्यात आली़ कर्मचाºयांना बदलीचे ठिकाण आॅनलाईन दाखवून त्यावर त्यांचे म्हणणे घेण्यात येत होते़ नंतर त्या कर्मचाºयांचे समुपदेशन करुन त्याला बदली दिली जात होती़ बदली प्रक्रियेचा सोमवारी पहिलाच दिवस होता़ पहिल्याच दिवशी गोंधळ झाला.प्रक्रियाच साडेबारा वाजता सुरु झाल्यामुळे रात्री नऊ नंतरही प्रक्रिया सुरु होती़ सर्वात शेवटी महिला व बालकल्याण विभागाच्या बदल्या करण्यात आल्या़ या विभागात सर्वाधिक महिलांची संख्या होती़ अकोले, संगमनेर, कर्जत, जामखेड या दूरच्या तालुक्यातून आलेल्या पर्यवेक्षिकांनाही रात्री ९ वाजेपर्यंत जिल्हा परिषदेत अडकून पडावे लागले़ अकोलेला जाण्यासाठी रात्री ८ वाजता शेवटची गाडी होती़ मात्र, ९ वाजेपर्यंत जिल्हा परिषदेतच थांबावे लागल्यामुळे या महिलांची मोठी गैरसोय झाली. अनेक महिलांनी सोबत डब्बेही आणलेले नव्हते़राहुरीच्या जागेत सीईओंचा ‘रस’ ?प्रशासकीय बदल्या करताना ज्या तालुक्यात अधिक पदे रिक्त आहेत, ती प्राधान्याने भरविण्याचे धोरण होते़ महिला बालकल्याण विभागाच्या बदल्या करताना पारनेरच्या एका कर्मचाºयाला बदलीवेळी कर्जतसह इतर चार तालुक्यातील सर्वाधिक रिक्त जागा स्क्रिनवर दाखविण्यात आल्या.या कर्मचाºयाने मात्र राहुरी तालुक्याची मागणी केली़ यावर कर्जतसह इतर चार तालुक्यात अधिक पदे रिक्त असून, ती पदे अगोदर भरावयाची असल्याने तुम्हाला राहुरी घेता येणार नाही, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी स्पष्ट केले़ मात्र, त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांनी हस्तक्षेप करीत राहुरीची रिक्त जागा अगोदर भरा, असा आदेश केला़ त्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांचाही नाईलाज झाला़ त्यानंतर दुसºया एका महिला कर्मचाºयानेही राहुरीत बदली मिळण्याची मागणी केली़ त्यावेळी मात्र, राहुरीत एकच जागा भरावयाची होती, असे सांगत तिला बदली देण्याचे टाळले. यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी कदम यांच्याशी संपर्क साधला़ मात्र, त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला़ सीईओ माने यांच्याशीही संपर्क केला. मात्र त्यांनी दूरध्वनी स्वीकारला नाही.कर्मचाºयांमध्ये नाराजीजिल्हा परिषदेतील बदल्यांमध्ये पहिल्याच दिवशी गोंधळ पहायला मिळाला़ सपाटीकरणाच्या बदल्या करण्यात येणार नसल्याचे आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनला दिले होते़ मात्र, प्रत्यक्षात सपाटीकरणाच्याही बदल्या करण्यात आल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकाºयांत एकवाक्यता नाही हे चित्र यावेळीच्या बदली प्रक्रियेत ुदिसत आहे. युनियनच्या पदाधिकाºयांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.महिला बालकल्याणच्या बदल्यांमध्ये गोंधळजिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या बदल्या करताना मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला आहे़ प्रशासनाने सोयीने बदल्यांचे निकष लावल्याचे दिसत आहे़ महिला बालकल्याण विभागात प्रशासकीय बदल्या करताना नगर, श्रीगोंदा, श्रीरामपूर या तालुक्यात सक्तीने सपाटीकरणाच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या़ कोपरगाव तालुक्यातील कर्मचारी प्रशासकीय बदलीला वरच्या क्रमांकावर असताना त्या तालुक्यात जागा रिक्त होतील, असे कारण देत या कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या नाहीत़ दुसºया तालुक्यांबाबत मात्र हा विचार करण्यात आला नाही़ बदलीने नियुक्ती देताना एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा प्रत्येक प्रकल्प विचारात घेण्यात आला़ मात्र, नंतर सपाटीकरणाच्या बदल्या करताना तालुक्याची सेवा ज्येष्ठता यादी विचारात घेण्यात आली. त्यामुळे नगर तालुक्यातील तीनपैकी दोन प्रकल्पांतील कर्मचाºयांच्या बदल्या न करता एकाच प्रकल्पातील तीन जागा रिक्त करण्यात आल्या़ ज्या कर्मचारी बदलीला पात्र नाही त्यांचीही बदली केली गेली. उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ही विसंगती निदर्शनास आणल्यानंतरही मुख्य कार्यकारी अधिकारी या बदल्या करण्यावर ठाम होते.पहिल्याच दिवशी ४२ बदल्याजिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागात सर्वाधिक ११ बदल्या करण्यात आल्या़ यामध्ये २ सहाय्यक बालविकास अधिकाºयांना विनंती बदल्या देण्यात आल्या तर एका विस्तार अधिकाºयाला आपसी बदली देण्यात आली़ पर्यवेक्षिकांमध्ये ३ महिलांच्या प्रशासकीय, ५ जणींच्या समानीकरणातून बदल्या करण्यात आल्या आहेत़ अर्थ विभागात सहायक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ सहायक लेखा, कनिष्ठ सहायक लेखा अशा चार प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या़ पशुसंवर्धन विभागात २ सहायक पशुसंवर्धन अधिकाºयांची तर १५ पशुधन पर्यवेक्षकांची बदली करण्यात आली आहे़ कृषी विभागातील ४ कृषि अधिकारी व ४ विस्तार अधिकाºयांची बदली करण्यात आली़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAhmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूक