शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
3
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
6
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
7
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
8
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
9
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
10
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
11
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
13
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
15
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
16
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
17
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
19
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
20
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

लोणीत आत्मक्लेश : विखेंनी शेतक-यांचे आंदोलन दडपू नये-अजित नवले यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 2:23 PM

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आंदोलन हाणून पाडण्यासाठी दडपशाही चालविली आहे. पुतळ्याजवळ पाणी ओतले आहे. शेवगाव गोळीबारातील जखमी शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. विखेंनी आंदोलन चिरडू नये. लोणीतील दडपशाही अधिक काळ सहन करणार नाही. जीव गेला तरी बेहत्तर, पण आता आम्ही शेतक-याच्या घामाला दाम मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी दिला.

लोणी : ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्या हक्काच्या भावासाठी आंदोलन करण्यास सहकाराचे जनक असलेले लोणीतील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी आत्मक्लेश आंदोलनासाठी बसले आहेत. त्याच पद्मश्रींचे चिरंजीव असलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आंदोलन हाणून पाडण्यासाठी दडपशाही चालविली आहे. पुतळ्याजवळ पाणी ओतले आहे. शेवगाव गोळीबारातील जखमी शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. विखेंनी आंदोलन चिरडू नये. लोणीतील दडपशाही अधिक काळ सहन करणार नाही. जीव गेला तरी बेहत्तर, पण आता आम्ही शेतक-याच्या घामाला दाम मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी दिला. गुरूवारी दुपारी आंदोलकांसमोर ते बोलत होते.

राधाकृष्ण विखे-पाटील आंदोलन दडपत आहेत, शेतक-यांचा आरोप - अजित नवले यांचे भाषण

ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्या हक्कासाठी आंदोलन करण्यासाठी देशातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करणा-या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या लोणी (ता. राहाता) येथील पुतळ्यासमोर शांततामय मार्गाने आत्मक्लेश आंदोलनासाठी जमले आहेत. पण पुतळ्याजवळ पाणी ओतून विखे समर्थकांनी आंदोलकांना रस्त्यावर बसविले आहे. शेतक-यांचे नेते म्हणविणारे विखेच शेतक-यांचे आंदोलन दडपण्यास निघाले आहेत. डहाणूकरांच्या काळापासूनच खाजगी कारखानदारीस शेतक-यांनी विरोध केलेला आहे. विखेंनी कितीही दडपशाही केली तरी आजही शेतकरी जिंकतील, असा विश्वास डॉ. नवले यांनी व्यक्त केला.तर अजय बारसकर म्हणाले, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे हेच आमचे विठोबा आहेत. आम्ही शेतक-यांची मुले न्याय मागण्यासाठी त्यांच्या दारात आलो आहोत. पण त्यांचेच पुत्र शेतक-यांवर अन्याय करीत आहेत. ऊस दरासाठी शेवगाव तालुक्यात आंदोलन करणा-यांवर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात जखमी झालेले शेतकरी आत्मक्लेश आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांचेही राज्याच्या विरोधी पक्षनेत्यास देणेघेणे नाही, असेही बारसकर म्हणाले. राज्यभरातून आलेल्या विविध शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी अन्नत्याग करीत आत्मक्लेश आंदोलनात भाग घेतला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSugar factoryसाखर कारखाने