श्रीरामपूर : येथील महिला मंडळाच्या वतीने डॉक्टर आणि आपण उपक्रमाअंतर्गत कोरोनाविषयी जनजागृतीपर आयोजित ऑनलाइन व्याख्यानास चांगला प्रतिसाद मिळाला. मधुमेहतज्ज्ञ डॉ. दिलीप पडघन यांनी कोरोना विषाणूमुळे जगाचे बदललेले स्वरूप, लसीकरणाचे महत्त्व, कोरोना आणि मधुमेह यावर स्लाईड शोद्वारे मार्गदर्शन केले.
सर्वांना व्यवस्थित मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग व वारंवार हात धुणे याचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.
महिला मंडळाने सभासदांच्या कोरोनाविषयी महिलांकडून प्रश्न मागविले होते. त्यांचे शंकानिरसन यावेळी करण्यात आले.
उपक्रमात डॉ. सिंधू पडघन यांचे सहकार्य मिळाले. गुगल मीटद्वारे आयोजित व्याखानास सार्था विजय तांबे हिने तांत्रिक सहकार्य केले.
मंडळाच्या नूतन अध्यक्षा किरण वर्मा, विश्वस्त डॉ. अंजली आगाशे, अनिता जोशी, खजिनदार सुनीता श्रीखंडे यांनी नियोजन केले. विश्वस्त वत्सल काळे, वैजयंती जोशी, हर्षदा पंडित, शैलजा वाघमारे उपस्थित होत्या.
-- ---