शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

दोन मुले, पत्नीला विष देऊन डॉक्टरची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिले जीवन संपविण्याचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 12:29 AM

राशीन (जि. अहमदनगर ) : दोन मुले, पत्नीला विषारी इंजेक्शन देऊन डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी ...

राशीन (जि. अहमदनगर) : दोन मुले, पत्नीला विषारी इंजेक्शन देऊन डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कर्जत तालुक्यातील राशीन येथे उघड झाला. सकाळी बराच वेळ होऊनही डॉक्टरांसह कुटुंबीयांनी घराचा दरवाजा न उघडल्याने शेजारी व मित्रांनी दरवाजा तोडल्याने हा प्रकार समोर आला. त्यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्येचे कारण लिहिले आहे.

डॉ. महेंद्र जालिंदर थोरात (वय ४६), पत्नी वर्षा (४२), मुलगा कृष्णा (१७), कैवल्य (७) अशी मृतांची नावे आहेत. राशीन येथे डॉ. थोरात (बीएचएमएस) यांचे श्रीराम हॉस्पिटल आहे. १४ वर्षांपासून ते रुग्णसेवा करीत होते. शुक्रवारी ते रात्रीपर्यंत हॉस्पिटलमध्ये होते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. डॉ. थोरात यांनी रात्रीच दाेन मुलांसह पत्नीला विषारी इंजेक्शन दिले व त्यानंतर स्वत: गळफास घेतला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृत चौघांची उत्तरीय तपासणी कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली. शेजारी राहणारे लोक व मित्रांनी दरवाजा तोडला. घरात डॉ. थाेरात यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर शेजाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना फोन केला होता. 

मुलाचे दु:ख आम्हाला सहन होत नाही..

डॉ. थोरात यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिलेली आहे. आमचा थोरला मुलगा कृष्णा याला कानाने ऐकण्यास कमी (कर्णबधिर) येत होते. त्यामुळे आम्हाला समाजात अपराध्यासासारखे व सतत अपमानास्पद वाटत असे. यामुळे अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित होतो. कृष्णाचेही कशातच मन लागत नव्हते. समाधान वाटत नव्हते; पण हे तो बोलून दाखवत नव्हता. त्याचे हे दु:ख आम्ही वडील, आई म्हणून सहन करू शकत नव्हतो.

त्यामुळे मी व माझी पत्नी वर्षा चर्चा करून विचाराने हे आत्महत्येसारखे कृत्य करीत आहोत. या कृत्यास कोणालाही जबाबदार धरू नये. हे कृत्य आम्हास योग्य वाटत नसले तरी नाईलाजावास्तव करीत आहाेत. कृपया आम्हाला माफ करावे. संपत्तीतील वाटा कर्णबधिर मुलांच्या संस्थेस द्यावा, असे त्यांनी पत्रात म्हटल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.