प्लाझ्मा म्हणजे रक्तातील लाल रक्त पेशी, पांढऱ्या पेशी व प्लेटलेटस् काढल्यानंतर उरलेल्या पिवळ्या रंगाचा भाग प्लाझ्मा ब्लड बँकेत मशीनद्वारे रक्तातील पेशी वेगळ्या करून बनविला जातो. High titre convalescent plasma म्हणजे कोविडमधून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातील प्लाझ्मा, ज्याच्यात खूप जास्त प्रमाणात कोविडच्या विरुद्ध लढणारी प्रतिपिंडे (Antibodies) आहेत. असा प्लाझ्मा कोविडबाधित रुग्णांना देण्यात येत होता; परंतु वेगवेगळ्या अभ्यासांमधून असे लक्षात आले आहे की, प्लाझ्माथेरपीमुळे कोविड पेशंटमधील मृत्यूदर कमी होत नाही, तसेच कोविडची तीव्रता वाढण्यास अटकावही होत नाही. या ट्रायल्स भारतासह वेगवेगळ्या देशांत झालेल्या आहेत. उलटपक्षी प्लाझ्माथेरपीमुळे विषाणूमध्ये म्युटेशन होण्याची शक्यता वाढते, हे लक्षात आले आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्लाझ्माथेरपीचा वापर उपचारात करू नये, असे निर्देश दिलेले आहेत.
(सोर्स : एआयआयएमएस, आयसीएमआर कोविड-१९ नॅशनल टास्क फोर्स)