-----------
आपले मुख, दात, हिरड्या हे कधी आपल्या सर्वांगीण आरोग्याचा आरसा असण्याची भूमिका बजावतात, तर कधी जंतूंना शरीरात शिरकाव करण्याचे प्रवेशद्वार म्हणून कारणीभूत ठरू शकतात.
सध्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या दातांचे आरोग्य जपण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक साधनांची स्वच्छताही महत्त्वाची आहे. कशी ते पाहू या:
१) टुथब्रश ठेवण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकाने वेगवेगळी जागा नेमावी.
२) शक्यतो, सध्या कुटुंबातील सर्वांनी टुथपेस्टही वेगळी (स्वतंत्र) वापरावी.
३) टुथब्रश ठेवण्याच्या जागेत हवा खेळती असावी.
४) बाथरूमच्या आत कधीच टुथब्रश ठेवू नये.
५) बाजारात काही टुथब्रशबरोबरच मापाची प्लास्टीकची कव्हरे येतात. हे वापरत असल्यास छिद्रे असलेली कव्हरे निवडावीत, म्हणजे ब्रशच्या आजूबाजूला आर्द्रता साठणार नाही.
६) दात घासण्यापूर्वी व नंतर टुथब्रश गरम पाण्याने व्यवस्थित धुवावा.
७) दात घासून झाले की, टुथब्रशचे डोके वरच्या बाजूला येईल, अशा पद्धतीने तो वाळवावा. अशाने ब्रशच्या तंतूंवर सूक्ष्मजीवांची वाढ होण्यास प्रतिबंध होईल.
८) आपला विलगीकरणाचा काळ संपला की, टुथब्रश जरूर बदलावा.
९) जुना टुथब्रशही स्वच्छ धुऊन व्यवस्थित बंद पिशवीतून टाकून द्यावा.
- डाॅ. भक्ती दातार, पुणे.
(दंतरोग व सामाजिक प्रतिबंधात्मक दंतचिकित्सा तज्ज्ञ)