दुसऱ्या लाटेमध्ये कोविड संसर्गाच्या तुलनेने जास्त आहे. विषाणूतील म्युटेशनमुळे हे होऊ शकते.
कोविड संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी साबणाने स्वच्छ हात धुणे, मास्क वापरणे आवश्यक
दोन वर्षांपुढील मुलांना मास्क वापरण्यास भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेने सुचविलेले आहे.
इतर मुलांबरोबर न खेळणे आवश्यक आहे,
जेंव्हा घरातील व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह असल्यास, मुलांना कोविडची लक्षणे असल्यास, मुलांना तीन दिवसांच्यावर ताप असल्यास.
लहान मुलांमधील कोविडची लक्षणे
सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, पोटदुखी, जुलाब, उलट्या आदी (लगेच बालरोगतज्ज्ञांना दाखविणे)
आरटी-पीसीआर तपासणी सर्वोत्तम आहे. सीटी स्कॉन करण्याची शक्यतो गरज नाही. जर आई पॉझिटिव्ह असेल, बाळ पॉझिटिव्ह असेल, दोघे पॉझिटिव्ह असेल तरी स्तनपान चालू ठेवणे.
पॉझिटिव्ह मुलांना आजी-आजोबांजवळ ठेवू नये
१-२ टक्के कोविडग्रस्त बालरुग्णांना आयसीयूची गरज पडू शकते.
धोक्याची लक्षणे
४-५ दिवस कडक ताप, जेवण-पाणी कमी पित असल्यास, दम लागत असल्यास, ऑक्सिजन ९५ च्या खाली असल्यास.
--------------