अहमदनगर: शहरातील खासगी रुग्णालयाकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील डाक्टर हतबल झाले आहेत. ऑक्सिजन नसल्याने उपचार करणा-या रुग्णांना कुठेही घेऊन जा अशा विनवण्या खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी नातेवाईकांना केल्या आहेत.
नगर शहरातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची स्थिती भयानक झाली आहे. शहरात ऑक्सिजनची 50 टनाची गरज असताना फक्त 22 टनच ऑक्सिजन मिळत आहे. जो काल परवा मिळत होता तोही ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागल्याने डॉक्टर चिंतेत आहेत.
दुसरीकडे ऑक्सिजन पुरवठयाबाबत प्रशासनाने समन्यायी वाटपासाठी समिती नियुक्त केली आहे. पण ऑक्सिजनचा पुरवठाच नाही तर वाटप कशाचे करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.