अहमदनगर : शहरातील प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ़ महेश महादेव राऊत (४१, रा़ गुलमोहर रोड, नगर) यांनी सोमवारी रात्री मार्केटयार्ड परिसरातील फाटके हॉस्पिटलमध्ये भुलीचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली़ मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील टाटा रुग्णालयातील भूलतज्ज्ञ महिला डॉक्टरने अशाच प्रकारे आत्महत्या केली होती.पोलिसांना डॉ़ राऊत यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळली. त्यामध्ये घरगुती व आर्थिक कारणातून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. पोलिसांकडून हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येत आहे.राऊत हे फाटके हॉस्पिटल व जिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते़ सोमवारी रात्री ते हॉस्पिटलच्या रेस्टरूममध्ये थांबले होते़ रात्री त्यांनी भुलीचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली़ मंगळवारी सकाळी हॉस्पिटलमधील कर्मचारी साफसफाईसाठी आले असता, ही घटना उघडकीस आली.
आर्थिक कारणातून नगरमध्ये डॉक्टरची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 12:47 AM