पालिकेकडे ५० वर्षांहून अधिक जुने व नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आहेत. बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या नगररचना विभागाकडे योजनांचे नकाशे, बांधकाम परवानगीविषयक प्रकरणे उपलब्ध आहेत. ती अद्ययावत व सुस्थितीत असणे आवश्यक आहे; परंतु सध्या हे रेकॉर्ड पुरेशा जागेअभावी व्यवस्थितपणे ठेवण्यात आलेले नाही. जुनी बांधकाम परवानगीची प्रकरणे व काही नकाशे हे जीर्ण झालेले आहेत. त्याचे तुकडे पडत आहेत.
रेकॉर्ड विस्कळीत झाले आहे. त्यामुळे नागरिकांना ते शोधण्यासाठी व आवश्यक माहितीसाठी वारंवार चकरा माराव्या लागत आहे. ही बाब विचारात घेता त्यांचे स्कॅनिंग करून डिजिटल फाईलमध्ये कायमस्वरूपी सुस्थितीत जतन करणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक ते स्कॅनर, प्रिंटर उपलब्ध करून देण्यासाठी येत्या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये पुरेशी तरतूद करण्यात यावी, अशी मागणी हेमा गुलाटी यांनी केली आहे.
----