श्रीगोंदा : तालुक्यात कोरोनाचा अद्याप प्रवेश झाला नाही. भविष्यात होऊ नये तहसीलदार महेंद्र महाजन यांनी दिलेल्या आदेशानुसार प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होम टू होम सर्व्हे करण्याच्या मोहिमेत उतरले आहेत. शिक्षकांवर कोविड-१९ ग्रामसुरक्षा समितीत काम करताना नऊ प्रकारची कामे दिले आहेत. गटशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांनी शिक्षकांकडून कामे करून घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांच्यावर टाकली आहे. शनिवारी २५ शिक्षकांनी बफरझोनमधील निमगाव खलू येथे होम टू होम जाऊन कोविड-१९ व सारीबाबत नागरिकांची विचारपूस केली. शिक्षकांनी केलेल्या मोहिमेत लॉकडाऊन असताना काही कुंटुब सदस्य घरी आढळले नाहीत. शिक्षक चार दिवसात सर्व्हेचे काम पूर्ण करून गटविकास अधिकाºयांना देणार आहेत. हा अहवाल आल्यानंतर सर्व माहिती समजणार आहे.
घरात कुणाला सर्दी, ताप आहे का..? शिक्षकांचा घरोघरी सर्व्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 11:15 AM