कोपरगाव : शहरातील प्रगत शिवाजी रोड संयुक्त तरुण मंडळ व मित्र फाउंडेशन आयोजित जय लक्ष्मी आई चषक या क्रिकेट स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या क्रिकेट स्पर्धेत वैजापूर येथील डॉल्फिन संघ विजेता ठरला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण संजीवनी फाऊंडेशनचे सचिव सुमित कोल्हे, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे व मित्र फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव आढाव यांच्या हस्ते पार पडले. जवळपास ४६ संघ व ५०६ खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. पाच दिवसात एकूण ५० सामने खेळले गेले. या स्पर्धेत ३१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक व चषक वैजापूर येथील डॉल्फिन संघाने पटकावले आहे. २१ हजारांचे द्वितीय पारितोषिक व चषक राहुरी येथील एफसीसी क्रिकेट संघाने, ११ हजारांचे तृतीय पारितोषिक व चषक कोपरगाव ग्रामीण संजीवनी फाऊंडेशनने, तर ५ हजारांचे चतुर्थ पारितोषिक व चषक हे कोपरगाव शहर छत्रपती संघाने पटकावले आहे.
स्पर्धा यशस्वीतेसाठी महेश आमले, मनोज आढाव, दीपक मैंदळ, अल्ताफ शेख, पवन शिंदे, अनुप तिवारी, राजेंद्र होन, जगदीश लकारे, विकी वाडेकर, शरद होन, बंटी पांडे, संजय ठाकूर, चंद्रकांत वाघमारे, आकाश आमले, भूषण नरोडे, मयुर शेळके, ओम भागवत, रोहित आढाव, विक्रांत कुदळे, आनंद पारख, गणेश रुईकर, देव बागुल, कल्पेश नरोडे, अभिषेक आढाव, राकेश डोंगरे, शिवकिरण आमले, तुषार विध्वंस यांनी विशेष परिश्रम घेतले.
..................
फोटो-११क्रिकेट पारितोषिक वितरण
....
ओळी - संजीवनी फाऊंडेशनचे सचिव सुमित कोल्हे, विवेक कोल्हे, वैभव आढाव यांच्या उपस्थितीत क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.