या उपक्रमास कमलेश गांधी, चैतन्यपूरचे सरपंच नितीन डुंबरे, सचिन नरवडे यांना कोरोनाग्रस्तांना दोन वेळचे मोफत जेवण देण्याची कल्पना अमलात आणली. परिसरातील बेलापूर, बदगी, चैतन्यपूर, जायकवाडी, कळंब, पिसेवाडी, चास, पुणे, मुंबईसह, बंगळूर, न्यू यॉर्क असा मदतीचा ओघ सुरू आहे. लोकवर्गणीतून अन्नदानाचे काम केले जात आहे. शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत या कामात कुठे कमी पडायचे नाही हा निश्चय सर्व कार्यकर्त्यांनी केला आहे.
सध्या ५३ रुग्ण दाखल आहेत. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत टाले, डॉ. बाबासाहेब सोनवणे व आरोग्य कर्मचारी यांचे योगदान आहे. जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख यांच्या माध्यमातून येथील आरोग्य केंद्रास जिल्हा परिषद निधीतून रुग्णवाहिका मिळाली आहे. तालुक्यातील प्राथमिक,माध्यमिक शिक्षक मदतीला धावून आले. त्यांनी वीस हजार किंमतीची मोफत औषधे दिली. त्यासाठी त्यांना ठाणे येथील अविष्यत संस्थेने मदत केली.
त्याशिवाय प्राथमिक शिक्षक संघाने गाद्या, उशा, बेडशीट असे अत्यावश्यक साहित्य दिले. सीताराम पाटील गायकर प्रतिष्ठानने ५१ हजार रुपयांची औषधे आणि वैद्यकीय साहित्यासाठी मदत केली. प्रेम-स्नेह संस्थेने रुग्णांच्या भोजनासाठी मोफत अन्नधान्याचे किट दिले.
सह्याद्री विद्यालयाची १९९६ दहावी बॅच २१ हजार, १९९९ दहावी बॅच ३१ हजार, स्वप्नील पाबळे २५ हजार, प्रकाश भळगट यांच्याकडून ग्रामीण रुग्णालयासाठी ३० हजार रुपये किमतीचे इन्व्हर्टर व बॅटरी, वकील अशोक गायकर यांचेकडून २५ हजार रुपयांचे उपयोगी साहित्य, लक्ष्मण महाले यांच्याकडून पन्नास स्टीमर, शिवाजी वाळुंज यांच्याकडून वीस हजारांची औषधे, उपसरपंच सुभाष गायकर यांच्याकडून २५ हजार असा निधी जमा झाला. दीपक गायकर यांच्याकडून दोन हजार अंडी दिली.