शिर्डी : आंध्रप्रदेश येथील एका साई भक्त परिवाराने साईबाबांच्या चरणी तब्बल सव्वा किलो वजनाच्या दोन निरंजन आरती दान स्वरूपात दिल्या आहेत़ या दोन्ही सोन्याच्या निरंजनीचे वजन सव्वा किलो असून याची किमत जवळपास पस्तीस लाख रुपये असल्याची माहिती साई संस्थांनच्या वतीने देण्यात आली आहे.साईबाबांना सोन्याच्या निरंजन आरती देणाऱ्या या साईभक्त परिवाराच्या इच्छेनुसार या दोन्ही निरंजन आरती साईबाबांच्या दिवसभरात होणाºया चार ही आरतीत वापरण्यात येत आहे. साई चरणी सव्वा किलो वजनाचे तब्बल ३५ लाख रुपयांचे सुवर्ण अर्पण करणाºया साई भक्त परिवाराने आपले नाव गुपित ठेवले आहे. साईबाबांचे भक्त असलेल्या देश विदेशातील भाविकांच्या श्रद्धेतुन सार्इं संस्थानला समृद्धी आली आहे़ साई समाधीच्या कळसाला सोने लावल्यानंतर व सुवर्ण पादुका केल्यानंतर बाबांना ११० किलोचे सोन्याचे सिहांसन दान म्हणुन आले, पाठोपाठ मंदीराचा गाभा-यालाही सुवर्ण झळाळी आली़ त्यानंतर सोन्याच्या वस्तु दान करण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढच होत आहे.एकीकडे भाविकांच्या दातृत्वातुन संस्थानची तिजोरी ओसंडुन वाहत असतांना भाविकांसाठीच्या अनेक सुविधा आजही पुर्णत्चास गेलेल्या नाहीत़ सीसीटीव्ही, दर्शनबारी, मनोरंजनासाठी पार्क, शहरातील रस्ते व चौंकाचे सुशोभीकरण, स्वच्छतागृहे आजही कागदावरच आहेत.