शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

लॉकडाऊनमध्ये साईबाबांना अडीच कोटीची देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 3:08 PM

कोरोनाच्या संकटामुळे १७ मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे़ गेल्या ४८ दिवसांच्या कालावधीत साईभक्तांकडून आॅनलाईनव्दारे साईबाबांना २ कोटी ५३ लाख ९७ हजार ७७८ रुपये देणगी संस्थानला प्राप्त झाली असल्याची माहिती सोमवारी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी ‘लोकमत’ला दिली.

शिर्डी : कोरोनाच्या संकटामुळे १७ मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. गेल्या ४८ दिवसांच्या कालावधीत साईभक्तांकडून आॅनलाईनव्दारे साईबाबांना २ कोटी ५३ लाख ९७ हजार ७७८ रुपये देणगी संस्थानला प्राप्त झाली असल्याची माहिती सोमवारी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी ‘लोकमत’ला दिली.देशात व राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आले. संस्थानने तत्पूर्वीच १७ मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद केले होते. साईबाबांचा महिमा व त्यांची शिकवणूक संपूर्ण जगात पोहचलेली असून त्यांचा भक्त वर्ग देशात व परदेशात मोठ्या प्रमाणात आहे. मंदिर बंदच्या काळात टाटा स्कॉय, संस्थान संकेतस्थळ व मोबाईल अ‍ॅप्सव्दारे थेट आॅनलाईन दर्शनाचा लाभ साईभक्त घर बसल्या घेत आहेत. यामध्ये टाटा स्कॉयवर सुमारे ३५ लाख साईभक्त अ‍ॅक्टीवेट असून १ लाख १२ हजार साईभक्तांनी संस्थानचे मोबाईल अ‍ॅप्स डाऊनलोड केलेले आहे. तर संकेतस्थळाला दररोज सुमारे ८ ते ९ हजार साईभक्त भेट देत आहे, अशी माहितीही डोंगरे यांनी दिली. आॅनलाईन देणगीचा ओघ साईबाबांचे मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद असले तरी ही साईभक्तांनी बाबांना दक्षिणा देण्याची परंपरा सुरु ठेवली आहे़ जगाच्या व देशाच्या कानाकोप-यातून साईभक्त संकेतस्थळाव्दारे व मोबाईल अ‍ॅप्सव्दारे आॅनलाईन देणगी संस्थानला पाठवत आहे. यातूनही ही ४८ दिवसात अडीच कोटींची देणगी मिळाल्याचे अरुण डोंगरे यांनी सांगितले.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdi-acशिर्डीsaibabaसाईबाबा