अहमदनगर : सध्या कोरोना रूग्णांची संख्या सुरू असली तरी बसेस सुरू आहेत. ग्रामीण भागातील बससेवा बंद असली तरी प्रमुख शहरांना जोडणारी बससेवा सुरु आहे. शहरांना जोडणारी लालपरी गावाकडे फिरकत नसल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठे हाल होताहेत.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी प्रवाशी कामानिमित्ताने नियम पाळत प्रवास करत आहेत. शहरातील माळीवाडा, तारकपूर व स्वस्तिक बसस्थानकावरून बसेस धावत आहेत.
.............
रोज ४०० बसेस
सध्या जिल्हा मुख्यालयावरुन रोज ४०० बसेस ये-जा करतात. ग्रामीण भागातील निवडक ठिकाणी आणि राज्यातील विविध भागातून तारकपूर आगारात दररोज ४०० बसची ये-जा सुरु असते.
...............
नो वेटिंग (बॉक्स)
सध्या मुंबई, पुणे, कल्याण, नाशिक, औरंगाबाद यासह विविध महत्त्वाच्या शहरासाठी बससेवा सुरु आहे. तारकपूर, माळीवाडा आणि स्वस्तिक बसस्थानकावरून बससेवा सुरु आहे. मात्र आगाऊ बुकिंग व्यवस्था सुरु असली तरी कुठेही वेटिंग नाही.
रातराणी केवळ १०
सध्या तारकपूर, माळीवाडा बसस्थानकावर १० रातराणी रात्री बसेस सुरू आहेत. या बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची संख्या
कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना जिल्ह्याच्या बाहेर जाणाऱ्यांची संख्या थोड्या प्रमाणात घटली आहे. कोरोनामुळे बहुतांशी काम घरूनच सुरु असल्याने प्रवास बंद आहे. महत्त्वाच्या कामासाठीच लोक बाहेर पडत असल्याने जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची संख्या घटली आहे.
..............................
प्रतिक्रिया
सध्या गर्दीच्या ठिकाणी बसेस सुरु आहेत. ग्रामीण भागात शाळा, कॉलेज बंद असल्यामुळे प्रवाशांची संख्या कमी आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सेवा देणे परवडत नाही. त्यामुळे सध्या तरी ग्रामीण भागात बसची संख्या कमी करण्यात आली आहे.
- विजय गिते, विभाग नियंत्रक
....................
प्रतिक्रिया
सध्या शहरांना जोडणारी बससेवा सुरु असली तरी ग्रामीण भागातील बससेवा बंद आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांची त्यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. महामंडळाने त्वरित ग्रामीण भागातील बससेवा सुरु करण्याची गरज आहे.
- संपत कोळेकर, प्रवासी