शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
3
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
4
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
5
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
6
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
8
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
9
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
10
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
11
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
12
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
13
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
14
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
15
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
16
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
17
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
18
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
19
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
20
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले

शिर्डीत रक्तरंजित पहाट; डबल मर्डर आणि एका हाफ मर्डरने साईनगरी हादरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 11:17 IST

या घटनांमुळे शिर्डीत तणावपूर्ण शांतता आहे.

प्रमोद आहेर, शिर्डी : शिर्डीत आज पहाटे झालेल्या भीषण हत्याकांडात साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांचा बळी गेला तर अत्यवस्थ असलेल्या एका ग्रामस्थावर प्रवरानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेतील मयत झालेले सुभाष घोडे हे मंदिरातील कर्मचारी ड्युटीवर येत होते, तर नितीन शेजुळ हे सुरक्षा कर्मचारी ड्युटी संपवून घरी निघाले होते. कृष्णा देहरकर हे मुलाला सोडून घरी निघाले होते. त्यांच्यावरही प्राणघातक हल्ला झाला. पहाटे चार ते साडेपाच दरम्यान विमानतळ रोडला विविध ठिकाणी या घटना घडल्या.

मोटार सायकलवर असलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशाने या तिघांना अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली. इतक्यावरच न थांबता विकृत मनोवृत्तीतून आरोपींनी या तिघांवर चाकूने असंख्य वार केले. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.

पोलिसांनी अपघात असल्याचे सांगून घटना गांभीर्याने न घेतल्याने मृतांचे नातेवाईक व नागरिकांनी संताप व्यक्त केला. घोडे यांच्या नातेवाईकांनी आरोपींना जोवर अटक होत नाही तोवर मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली आहे. या घटनांमुळे शिर्डीत तणावपूर्ण शांतता आहे.दरम्यान, सकाळी घटनास्थळी आलेल्या माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे सांगितले. "याबाबत साडेपाच वाजता कॉन्स्टेबलला कळवल्यानंतर त्यांनी बॉडी रुग्णालयात आणून अपघाताची नोंद केली. ज्या पोलिसाला अपघात व खून यातील फरक कळत नाही त्याला पोलिसात राहण्याचा अधिकार नाही. त्याच्या निलंबनासाठी पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे, पोलीस निरीक्षक यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. शिर्डीची गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील. येथील पोलीस व्हीआयपी दर्शन प्रोटोकॉलमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे प्रोटोकॉलसाठी स्वतंत्र पोलीस देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आग्रह धरून अनेक  दिवसांचा हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात येईल," असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी रुग्णालयात येऊन मयताच्या नातेवाईकांची भेट घेतली. याशिवाय शिर्डीचे ताराचंद कोते, सचिन चौघुले, कैलास  कोते, शिवाजी गोंदकर, अनिता जगताप, विजय जगताप, कैलास कोते आदींनी रुग्णालयात येऊन नातेवाईकांची भेट घेतली. अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची त्यांनी मागणी केली.

टॅग्स :shirdiशिर्डीCrime Newsगुन्हेगारी