संगमनेर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त शिक्षक नेते, पुरोगामी विचारवंत तसेच संगमनेर नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक हिरालाल पगडाल यांनी १२९ पुस्तकांची गुडी उभारून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोख्या पध्दतीने अभिवादन केले. शिक्षक नेते पगडाल यांनी त्यांच्या संगमनेरातील घरी १२९ पुस्तकांची गुढी उभारली. त्यात कार्ल मार्क्स, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांची वैचारिक मीमांसा करणारी काही पुस्तके आहेत.संत कबीर, रविदास,गुरू नानक तुकाराम ज्ञानेश्वर, नामदेव तुकडोजी महाराज आदी संत साहित्य आहे. गीता, कुराण, बायबल आदी धार्मिक ग्रंथ व त्याची चिकित्सा करणारे ग्रंथ आहेत. विश्वकोश आणि संस्कृती कोष आहे. शिवरायांची बखर आहे. चार्वाक, बुद्ध, सानेगुरूजी, क्रांतिसिंह नानापाटील,भगत सिंग, नेमाडे, लिमये पंडीत जवाहरलाल नेहरू, लिंकन आदींची पुस्तके आहे. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वांग्मय देखील यात आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही एक व्यक्ती नाही, तो एक विचार आहे. कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आपल्याला बाहेर पडता येत नाही. त्यामुळे घरातच राहत त्यांना अभिवादन करण्यासाठी पुस्तकांची गुढी उभारून हा जागर करण्यात आला. तसेच पुस्तकगुढी उभारण्यामागे डॉ. आंबेडकर जयंती हा ज्ञानाचा उत्सव व्हावा. अशी अपेक्षा शिक्षक नेते पगडाल यांनी व्यक्त केली.
१२९ पुस्तकांची गुडी उभारून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन, शिक्षक नेतेहिरालाल पगडाल यांची संकल्पना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 3:05 PM