पारेगाव गडाख ग्रामपंचायत निवडणूकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते अॅड. त्रिंबकराव गडाख, एकनाथ गोडगे, सारगंधर गडाख, कैलास गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखालील आश्वीनाथ ग्रामविकास मंडळाने विजय संपादन केला होता. आश्वीनाथ ग्रामविकासचे डॉ. संध्या गडाख, गणेश गडाख, आशा गोर्डे, लक्ष्मण गडाख, सिमा गडाख हे पाच सदस्य निवडून आले. तर विरोधी मंडळाचे रावसाहेब गडाख, विनोद गडाख, अर्चना गोर्डे व अर्चना गडाख हे चार सदस्य निवडून आले होते. सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव होते. सरपंचपद व उपसरपंच निवडणूक नुकतीच पार पडली. विरोधात कुणीही अर्ज न भरल्याने सरपंच व उपसरपंचपदाची निवड बिनविरोध पार पडली. त्यानंतर आश्वीनाथ ग्रामविकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.
पारेगाव गडाखच्या सरपंचपदी डॉ.संध्या गडाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 4:26 AM