संगमनेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नवनिर्वाचित खासदार डॉ.सुजय विखे पाटील व खासदार सदाशिव लोखंडे यांचे छायाचित्र असलेले फलक फाडल्याने नाशिक-पुणे महामार्गावर कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले आहे.संगमनेर शहरानजीक असलेल्या घुलेवाडीत डॉ.सुजय विखे पाटील व खासदार सदाशिव लोखंडे यांचे छायाचित्र असलेले फलक लावण्यात आले होते. हे फलक सोमवारी मध्यरात्री अज्ञातांनी फाडले. या घटनेचा शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी निषेध केला. कार्यकर्त्यांनी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्ग रोखून धरत रास्ता रोको आंदोलन सुरू केले.शिवसैनिक कैलास वाकचौरे, जयवंत पवार, शिवसेनेचे तालुका प्रमुख जर्नादन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, पंचायत समिती सदस्य अशोक सातुपते, लखन घोरपडे, राजश्री वाकचौरे, भाजपचे तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, निलेश पिडीयार, पुरूषोत्तम जोशी, बाळासाहेब राऊत, रवी गिरी, मंदा राऊत, सोनाली गिरी, ललीत ढगे यांसह शिवसेना-भाजप कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.फलक फाडणाऱ्यांचा पोलिसांनी शोध घेत त्यांना अटक करावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली.या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्या राजश्री राजाराम वाकचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फलक फाडणाºया अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.