शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

श्रीरामपूरकरांचे स्वप्नातील घर आवाक्यात

By admin | Published: February 17, 2016 10:39 PM

मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूर अव्वाच्या सव्वा किमतीतील महागडी, परवडू न शकणाऱ्या श्रीरामपूरकरांना स्वप्नातील घर आता आवाक्यात आले आहे.

मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूरअव्वाच्या सव्वा किमतीतील महागडी, परवडू न शकणाऱ्या श्रीरामपूरकरांना स्वप्नातील घर आता आवाक्यात आले आहे. श्रीरामपूरच्या बोरावकेनगरमध्ये सध्या महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ अर्थात म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेचे काम सुरू असून अंतिम टप्प्यात पोहचले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बांधकाम व्यावसायिक बी. जी. शिर्के कंपनीस या योजनेचे काम देण्यात आले आहे. ही कंपनी या योजनेतील सुमारे १ हजार घरांचे बांधकाम करीत आहे. पहिल्या टप्प्यात दोनशे ते अडीचशे सदनिका (फ्लॅटस्) बांधल्या जाणार आहेत. म्हाडाचे नाशिक येथील उपविभागीय अभियंता ए. के. जाधवर यांनी मंगळवारी श्रीरामपूरमधील या प्रकल्पास नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्यासमवेत भेट देऊन योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला.श्रीरामपूरच्या काही भागात सध्या १५ ते २५ लाख रुपये गुंठ्याने जमीन विकल्या जात आहेत. नाशिक-पुण्यापेक्षाही जमिनींचे भाव आकाशाला नेऊन ठेवल्याने सर्वसामान्य आम आदमीचे स्वप्नातील घराचे स्वप्न सध्याचे महागडे दर परवडत नसल्याने व त्याचा आर्थिक भार पेलवत नसल्याने अपूर्ण राहत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात श्रीरामपूरमध्ये फ्लॅट संस्कृती वाढीस लागली आहे. महागडे फ्लॅट घेऊ न शकलेला मोठा वर्ग अजूनही हक्काच्या घरापासून दूर आहे. अशा गरीब व मध्यम वर्गासाठी म्हाडामार्फत घरे बांधली जात आहेत. प्राथमिक अंदाजानुसार अल्प उत्पन्न गटासाठी ४२० स्क्वेअर फूट बिल्ट अप एरियाच्या वन बी. एच.के.च्या म्हाडाच्या फ्लॅटची किंमत १० लाख ८० हजार रूपये तर मध्यम उत्पन्न गटाच्या वन बी. एच. के. च्या ७०० स्क्वेअर फूट बिल्ट अप एरियाच्या फ्लॅटची किंमत सुमारे १९ ते २० लाख रुपयांच्या जवळपास निश्चित केली जात आहे. सध्या उपलब्ध असलेल्या खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या योजनांमधील २० लाखांपुढील फ्लॅटस् न परवडणाऱ्यांना म्हाडामुळे स्वप्नातील घर आवाक्यात आले आहे.