शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

निंबळक बायपासला ट्रक ड्रायव्हरचा भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 1:34 PM

नगर तालुक्यातील निंबळक बायपास येथे चाकूने भोसकून एका तरुणाचा खून करण्यात आाला. नवनाथ गोरख वलवे ( वय ३२, राहणार सारोळा कासार, ता. नगर) असे  मयत तरुणाचे नाव आहे. तो व्यवसायाने ट्रकचा चालक होता. 

अहमदनगर : नगर तालुक्यातील निंबळक बायपास येथे चाकूने भोसकून एका तरुणाचा खून करण्यात आाला. नवनाथ गोरख वलवे ( वय ३२, राहणार सारोळा कासार, ता. नगर) असे  मयत तरुणाचे नाव आहे. तो व्यवसायाने ट्रकचा चालक होता. सदर ट्रक ड्रायव्हरचा खून मंगळवारी पहाटे झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. लामखेडे पेट्रोल पंपाच्या एक कि.मी. पुढे वळण रस्त्यावर ही घटना घडली. रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये ट्रक ड्रायव्हरचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. त्याच्या पाकिटात असलेल्या कागदपत्रांवरून मयताची ओळख पटली. घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक मोहन बोरसे व पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.घटनास्थळी सारोळा कासारचे लोक जमा झाले. पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा ते शोध घेत आहेत. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेह उत्तरीय तपासणी अद्याप सुरू आहे. ट्रकमधून दुधाची पावडर नेली जात होती. त्यामध्ये मोठ्या किंमतीचा माल होता. या व्यवसायामधूनच त्याचा खून झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुधाची पावडर पुरवठा करण्याचा वलवे यांचा व्यवसाय होता, अशीही माहिती आहे.